विजयी उपनेता न्यूज – अंबाजोगाई प्रतिनिधी 12/06/2023 धम्मसंस्कार वर्ग ग्रुप भावठाणा येथील सर्व उपासिका आणि लहान मुले यांनी रविवारी संध्याकाळी ठिक 7 वाजता जी धम्मसंस्कार वर्गामध्ये उपस्थिती दाखवली ती खरंच उल्लेखनीय होती,येथील गाथा घेणारे सर्वांचे तात्या म्हणजेच आयु.वैजेनाथ होके यांनी गाथा घेतल्या तसेच येथील धडाडीचे उपासक लखन होके यांनी मुले घडवणे किती महत्वाचे आहे यावर प्रबोधन केले तसेच आयु.प्रशात होके यांनी उपासक आणि उपासिका यांनी दर रविवारी पाढर्याशुभ्र साड्या परिधान कराव्यात आणि उपासकांनीही पांढरी वस्त्रे परिधान करावीत अशी महत्वाची सूचना दिली त्यानंतर धम्मपालगाथा घेऊन अल्पोपहार देण्यात आला अशा प्रकारे आज भावठाणा येथील दुसरा धम्मसंस्कार वर्ग पार पडला .
धम्मसंस्कार वर्ग ग्रुप भावठाणा येथील उपस्थित राहिलेले सर्व उपासक आणि उपासिका तसेच बालक बालिका आणि सर्व सक्रिय धडाडीचे कार्यकर्ते या सर्वांचेच मनापासून आभार .