Homeकलामोक्यामध्ये सहा महिन्यापासून फरार असलेला चुहा गँगचा मुख्य सूत्रधारास भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक,भारती विद्यापीठ पोलिसाची कौशल्य पूर्ण कामगिरी
मोक्यामध्ये सहा महिन्यापासून फरार असलेला चुहा गँगचा मुख्य सूत्रधारास भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक,भारती विद्यापीठ पोलिसाची कौशल्य पूर्ण कामगिरी
विजयी उपनेता न्यूज – पुणे प्रतिनिधी 23/06/2023 भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुरनं 119 / 2023 भा .द.वि. कलम 307, 323 ,143, 144, 147, 148 , 149, आर्म ॲक्ट(25) मो पो कलम 37(1)(3) 135, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलम 31 3(2) 3(4) या गुन्ह्यातील टोळी प्रमुख आरोपी साकीब मेहबूब चौधरी उर्फ लतीफ बागवान वय 23 वर्ष रा.लुनिया बिल्डिंग ,चौथा मजला कदम चाळ ,संतोष नगर कात्रज पुणे हा दिनांक 16/ 02/ 2023 रोजी पासून मिळून येत नव्हता .
टोळी प्रमुख आरोपी साकीब मेहबूब चौधरी उर्फ लतीफ बागवान वय 23 वर्षे राहणार लुनिया बिल्डिंग चौथा ,मजला कदम चाळ संतोष नगर कात्रज पुणे हा गुन्हा घडल्यापासून फरार कालावधीत तो त्याचे अस्तित्व लपवून वारंवार वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये त्याचे ओळख व ठाव ठिकाणा बदलून वास्तव्य करत होता. त्याने त्याचदरम्यान कात्रज आणि संतोष नगर परिसरात स्वतःचे टोळीचे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता.
सदर आरोपीचा भारतीय पोलीस विद्यापीठ पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार याने वारंवार बाहेरील जिल्ह्यामध्ये गुप्त बातमीदाराचे नेटवर्क सक्रिय करून व तांत्रिक विश्लेषण करून शोध घेत असताना ,पोलीस अमलदार विक्रम सावंत ,अभिजीत जाधव, निलेश ढमढेरे, यांना आरोपी साकीब मेहबूब चौधरी उर्फ लतीफ बागवान हा मु. पो. नीरा ,तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे राहत आहे .अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व आमदार याने नीरा तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे जाऊन आरोपी साकीब मेहबूब चौधरी उर्फ लतीफ बागवान त्याचा शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी गुन्ह्याचे तपासी अधिकारी श्री नारायण शिरगावकर सौ. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे यांचे ताब्यात देण्यात आले.असून त्यांनी सदर आरोपीस अटक केली आहे.
आरोपी साकीब मेहबूब चौधरी उर्फ लतीफ बागवान हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्यावर यापूर्वी मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली होती .त्या गुन्ह्यापासून त्यास जामीन मिळाल्यानंतर त्याने पुन्हा कात्रज भागात वर्चस्व प्रस्थापित करण्याकरता त्याचे साथीदाराने पुन्हा त्याची टोळी तयार करून त्याने सदरचा गुन्हा केला आहे विशेषता आरोपी साठी महबूब चौधरी उर्फ बागवान हा त्याचे टोळीचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कात्रज भागातील शिक्षण घेणारे बालकांचा वापर करून त्याचे टोळीचे कात्रज भागामध्ये दहशत निर्माण करीत आहे .
सदरची कारवाई मा. प्रवीण कुमार पाटील, अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे मा. श्रीमती स्मार्तना पाटील, सो.मा. पोलीस उपा आयुक्त परिमंडळ 2 मा. नारायण शिरगावकर ,सौ मा सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे ,यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन कडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे )विजय पुराणिक साहेब पोलीस निरीक्षक अमोल रसाळ ,पोलीस उपनिरीक्षक सागर भोसले, पोलिस आमलदार विक्रम सावंत ,अभिजीत जाधव ,निलेश ढमढेरे ,चेतन गोरे, मंगेश पवार, हर्षल शिंदे ,अवधूत जमदाडे, सचिन सरपाले ,धनाजी धोत्रे, सचिन गाडे ,निलेश खैरमोडे, अभिनय चौधरी, अशीष गायकवाड ,राहुल तांबे ,यांच्या पथकाने केली आहे