विजयी उपनेता न्यूज- पिंपरी प्रतिनिधी 26/06/2023 पिंपरी चिंचवड येथील के.एस बी. चौकातील छत्रपती शाहू महाराज जयंती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रयतेचे राजे छत्रपती शाहू महाराज यांचे विचार जनसामान्य मध्ये पोहोचले पाहिजे, आणि ते पोचण्याचे काम इमान इतबारे वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहर च्या वतीने केले जात आहे ,याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे मत मा. पिंपरी चिंचवड शहर महासचिव संजय ठोबें यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले. वंचित बहुजन आघाडीचे माजी उपाध्यक्ष संतोष जोगदंड, पिंपरी चिंचवड सचिव मा.अशोक खोपे, शहर संघटक प्रमोद मगर, शहर सदस्य शशी कुमार टोपे, भिमशाही युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवशंकर उबाळे च्या सह पिंपरी चिंचवड वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते