विजयी उपनेता न्यूज -चिखली,पिंपरी चिंचवड प्रतिनिधी रयतेचे राजे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात सिद्धार्थ बुद्ध विहार प्रणित अंकुर सेवा संघाच्या वतीने मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरी करण्यात आली .या जयंतीच्या निमित्ताने अंकुर सेवा संघाचे सचिव मा. अशोक खोपे यांनी के.एस.बी चौक पिंपरी या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले .छत्रपती शाहू महाराजांनी दिलेला सामाजिक समतेचा वसा अखंडपणे चालवत राहू असे त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना मत व्यक्त केले. अंकुर सेवा संघाचे माजी उपाध्यक्ष मगर साहेब यांनी यावेळेस कार्यकर्त्याला मार्गदर्शन केले. यावेळेस विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते, अंकुर सेवा संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.