विजयी उपनेता न्यूज 22/10/ 2023 पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पार्टीचे दिग्गज नेते म्हणून समजले जणारे एकनाथ दादा पवार यांनी आज भारतीय जनता पार्टीतील सर्व पदांचा व प्राथमिक सद्यस्यात्वाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. या संदर्भात आपली उडी राजकीय भूमिका आपण येत्या 27 तारखेला जाहीर करू असे त्यांनी यावेळी सांगितले. एकनाथ पवार हे 25 ऑक्टोबरला मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधणार असे वृत्त आम्ही प्रसिद्ध केले होते. आज एकनाथ पवार यांच्या भूमिकेमुळे ते वृत्त तंतोतंत खरे ठरले आहे.
एकनाथ पवार यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली असून मराठा आंदोलनात ते तमाशा पाहत बसले आहेत मराठ्यांचे नेते मनोज जरंगे पाटील यांनी 40 दिवसाचा अल्टीमेटम दिला असतानाही या दोन्ही मराठा नेत्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे पक्षाची सर्व बंधने झुघरून आपण मराठा आंदोलनासाठी म्हणून राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एकनाथ शिंदे व अजित पवार या दोन्ही नेत्यांना मराठा त्यांची जागा दाखवून देईल असे स्पष्ट करत निर्णयसाठी अद्याप दोन दिवसाचा अवधी शिल्लक आहे . तुळजाभवानी त्यांना सद्बुद्धी देवो असं सुद्धा एकनाथ पवार यांनी सांगितलेभारतीय जनता पार्टीने मला खुप काही दिले अनेक नेत्यांनबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या आशीर्वादाने मला माझे नाव मिळवता आले असे सांगितले
Tags: विजयी उपनेता न्यूज