मुंबई दि 14 ऑक्टोबर (विजयी उपनेता न्यूज) :-राज्यातील विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्याचे विशेष संक्षिप्त पुन्हा निरीक्षण 1 जानेवारी 2024 या अहर्ता दिनांक वर करण्याबाबतचा कार्यक्रम सुरू आहे. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये होणार असून त्या दृष्टीने राज्यातील मतदार याद्या अद्यावत करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे. तसेच लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाचे उपयुक्त हिर्देशकुमारकुमार यांच्या नेतृत्वाखाली आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या पथकाने राज्यात दौरा केला. या पथकाने एन .एन बुटोलीया वरिष्ठ प्रदान सचिव सोम्याजीत घोष ,सचिव सुमन कुमार दास सचिव भारत निवडणूक आयोग यांच्या समावेश होता.
या पथकाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या समवेत सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक घेऊन मार्गदर्शन केले .या बैठकीमध्ये सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी वरील मुद्देच्या अनुषंगाने आपापल्या जिल्ह्याचे विस्तृत सादरीकरण आयोगासमोर यावेळी केले मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे ,सह मुख्य निवडणूक अधिकारी म.रा.पारकर तसेच मुख्य निवडणूक कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते .
या बैठकीमध्ये भारत निवडणूक आयोगाने तसेच मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांनी सर्व विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या अचूक व अद्यावत करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले .त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये 18 19 वर्ष वयोगटातील मतदार नोंदणी ची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी प्रयत्न करावेत ,ज्यामध्ये शाळा महाविद्यालय विविध आस्थापनामध्ये विशेष मोहीम राबवणे मतदार साक्षरता मंडळ संस्था तसेच महाविद्यालयातील स्वयंसेवकाच्या मदतीने या वयोगटातील अधिकारी तरुणाचे नाव मतदार यादी समाविष्ट करणे तदार नोंदणी अधिकार्याकडून महाविद्यालनिहाय मतदार -नोंदणीचा आढावा नियमित घेणे. इ. उपायोजना सुचवल्या
राज्यातील महिला तसेच दिव्यांग व्यक्तीची मतदार नोंदणी टक्केवारी वाढवण्यासाठी विशेष मोहीम राबवीत ग्रामसभा मध्ये मतदार याद्याचे वाचन करून टक्केवारी वाढवण्याचे निर्देश दिले .मतदार यादी मधील दुबार तसेच मृत व्यक्तीचे नाव वगळण्याबाबत करावयाच्या कार्यवाही चे मार्गदर्शन आयोगाने केल .मतदान केंद्रामध्ये सर्व किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश यावेळी देण्यात आले .त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुका 2019 मधील मतदाराची राष्ट्रीय सरासरी तसेच राज्य सरासरीपेक्षा कमी सरासरी असलेल्या विधानसभा मतदारसंघाकडे विशेष लक्ष देऊन तेथील मतदानाची आकडेवारी वाढविण्याच्या दृष्टीने आयोगाने उपाय योजना सुचविल्या, तसेच मतदार याद्याच्या आद्यावतीकरणांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना राष्ट्रीय मतदानाच्या दिवशी सन्मानित करण्यात येईल असेही निवडणूक अधिकारी यांनी सांगितले.