विजयी उपनेता न्यूज :-चिखली प्रतिनिधी मा. अशोक खोपे यांच्या स्वखर्चातून अंकुर सेवा संघ प्रणित सिद्धार्थ बुद्ध विहार ताम्वहणे वस्ती चिखली या ठिकाणी धम्म संस्कार वर्गातील मुलांना वही आणि पेन देऊन धम्म संस्कारांचे विचार बालमनावर बिंबवण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला आहे. त्यांच्या या कार्याला समाजातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असून त्यांनी केलेल्या या कार्य बद्दल समाजातून कौतुक होत आहे. त्यांनी आज बालमनावर जे धम्माचे संस्कार रुजवण्याची काम करत आहे त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे.. 52 व्या धम्मसंस्कार वर्गातील मुलांना एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सर्वांना शिकवलेला धम्माचा मार्ग लक्षात राहावा आणि तो मुलांनी वहीवर स्वतः लिहून काढावा म्हणजे विसर पडणार नाही .त्यासाठी प्रत्येकाला एक वही आणि एक पेन देण्यात आली .
तसेच बुद्धाने दिलेल्या धम्माच्या मार्ग जर आपण आत्मसात केला नाही तर जीवनात दुःख, ,तृष्णा,आणि लालच हे भेटणारच आहेत मग त्यावर एकच उपाय आहे .तो म्हणजे बुद्धाने दिलेल्या धम्माच्या मार्गावर स्वार होणे हाच एक उपाय आहे .हे मुलांना आज समजावून सांगण्यात आले तसेच सुरुवातीला जे शिकवले होते ते मुलांनी स्वतःच्या हाताने आज दिलेल्या वहीवर लिहले .तसेच काही मुलांनी आणि मुलींनी गाणे म्हटले व शेवटी संविधान प्रस्तावना गीत आणि शेवटी धम्मपालन गाथा घेऊन सर्व मुलांना अल्पोपहार दिला, अशा प्रकारे धम्मसंस्कार वर्गाची सांगता झाली.