Homeपिंपरी - चिंचवडमानवी पराभवाची कारणे, लोभी आणि उधळ्या, माणूस व कुळाचा गर्व असणाऱ्या माणसाचा पराभव अटळ आहे हे धम्म संस्कार वर्गातील मुलांना मा. अशोक खोपे यांनी समजावून सांगितले
मानवी पराभवाची कारणे, लोभी आणि उधळ्या, माणूस व कुळाचा गर्व असणाऱ्या माणसाचा पराभव अटळ आहे हे धम्म संस्कार वर्गातील मुलांना मा. अशोक खोपे यांनी समजावून सांगितले
विजयी उपनेता न्यूज :- 25/ 09/ 2023 चिखली प्रतिनिधी, अंकुर सेवा संघ प्रणित 50 व्या धम्म संस्कार वर्गामध्ये मुलांना मानवाच्या अधोगतीची बारा कारणांपैकी दोन कारणे मुलांना समजून सांगण्यात आली 1) जो मनुष्य लोभी आहे, उधळ्या आहे. अशा स्त्री किंवा पुरुषाला अधिकाऱ्याच्या जागेवर बसवले, तर अशा माणसांचा पराभव व अधोगती होते. कारण तो काटकसरी नसतो. त्यामुळे नेहमी त्याची अधोगती होते. नाश होतो, पराभव होतो म्हणून पती-पत्नी मुलगा-मुलगी,सर्वजण धनाची जाणीव ठेवणारे असले पाहिजेत. धन जपणारा असला तरच तो सुखी होतो आणि त्याची अधोगती होत नाही. त्याचा संसार सुखाचा होतो.
2) एखादा मनुष्य क्षत्रिय आहे त्याला आपल्या कुळाचा गर्व आहे. अशा माणसांचा पराभव होतो. कारण क्षत्रिय आहे,परंतु मनुष्य बळ नाही, धन नाही, कुळाच्या गर्वात राहतो, त्यामुळे त्याचा पराभव होतो. त्याची अधोगती होते. जातीच्या कुळाच्या नावावर कोणीही सुखी होत नाही. त्यासाठी मेहनत प्रयत्न करणे गरजेचे आहे. तरच सुख प्राप्त होते.