विजयी उपनेता न्यूज :-चिखली प्रतिनिधी 14/08/2023 पिंपरी चिंचवड महापालिका उद्यान विभाग व वृक्ष संवर्धन विभाग च्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 ठिकाणी वृक्षारोपण करण्याचा संकल्प करण्यात आला. दिनांक 01 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीमध्ये हा संकल्प साजरा होताना त्याचाच एक भाग म्हणून कृष्णा नगर साई गार्डन या ठिकाणी परिसरातील नागरिकांच्या वतीने मोठ्या उत्साहात व आनंदात वृक्षारोपण साजरे करण्यात आले. यावेळी सकाळी व्यायाम साठी आलेले नागरिक महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळेस प्रत्येक नागरिकांनी एक झाड तरी लावावे असा संकल्प करण्यात आला . त्यावेळी नाना मिसाळ, शामराव चौधरी, प्रमोद भोसले, नागेश धाराशिवे ,विजय कांगणे, तांबे ईश्वर, समाधान आगलावे, एस. के. हिरेमठ ,बाळासाहेब वैद्द, विवेक वाघधरे तानाजी काटकर ,मनोज तामाने ,मल्हारी गदादे वनिता एकनाथ थोरात ,सुभाष जाधव, रफी टंडन इत्यादी सह या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते