-
विजयी उपनेता न्यूज 7/08/ 2023 चिखली प्रतिनिधी अंकुर सेवा संघ प्रणित, सिद्धार्थ बुद्ध विहारांमध्ये मोठ्या उत्साहात फ्रेंडशिप डे साजरा करण्यात आला .या विहारांमध्ये लहान चिमुकले बालक तथा बालिका यांनी अमृततुल्य व्यक्तिमत्व मा.अशोक खोपे यांना फ्रेंड फ्रेंडशिप डे बांधून आनंद साजरा करण्यात आला. या विहारामधील मुला – मुलींना शुभ आशीर्वाद देऊन पुढील वाटचालीसाठी अशोक खोपे यांनी शुभेच्छा दिल्या ,विहारामध्ये सहा ते सोहळा वयोगटातील विद्यार्थ्यांना धम्म संस्कार वर्ग चालविले जातात .या धम्म संस्कार वर्गाच्या माध्यमातून एक आदर्श पिढी घडवण्याचं काम अशोक खोपे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे . हा फ्रेंड हा फ्रेंडशिप डे साजरा करताना लहान मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता .त्यामुळे या कार्यक्रमाचे मोठ्या प्रमाणात या परिसरात कौतुक होत आहे.