विजयी उपनेता न्यूज :- 23/7/023 चिखली प्रतिनिधी चिखली , अंकुर सेवा संघ प्रणित सिद्धार्थ बुद्ध विहार मेहत्रे वस्ती चिखली या बुद्ध विहारात आजपर्यंत 40 धम्म संस्कार वर्ग संपन्न झाले आहेत. या धम्म संस्कार वर्गातून 06 ते 16 वयोगटातील बालकावर धम्म संस्काराचे धडे दिले जातात. चारित्र्य ,आचरण, विचाराची शुद्धता ,आणि कर्म यावर विशेष भर दिला जातो, तसेच इंद्रियावर विजय मिळवून मानवी जीवन सुखमय कसे करता येईल याविषयी उपदेश दिले जातात मनाची शुद्धता आणि कृतज्ञता , दया ,दान, सत्य,शील,याविषयी बालमनावर धम्म संस्कार केले जातात या धम्म संस्कार वर्गामध्ये आजपर्यंत 75 ते 80 विद्यार्थी धम्म संस्कार वर्गातील अध्ययनाचा लाभ घेतात .हे सामाजिक कार्य कोणतेही आर्थिक लाभ मिळवण्यासाठी नसून ते एक समाज परिवर्तनाचे माध्यम म्हणून मा. अशोक खोपे यांनी स्वीकारले आहे .या कार्याला धम्म बांधवांनी सगळं हाताने लहान मुलांना एक वेळचा खाऊ देऊ धम्मदान देऊन या कार्याला प्रेरणा द्यायची आहे. हे कार्य पुढे अखंड चालू ठेवण्यासाठी आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे. ही केवळ एका व्यक्तीची जिम्मेदार नसून, ही सामाजिक बांधिलकी आहे. सम्राट अशोक यांनी वयाच्या 14 व्या वर्षी धम्म महायात्रेला सुरुवात केली होती. सम्राट अशोक यांची मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी श्रीलंकेमध्ये पाठवले होते. त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता समाजातील लहान मुलावर एक चांगले संस्कार घडत आहेत. लहान मुले – मुली डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले ,कबीर ,राजर्षी शाहू महाराज , गाडगे बाबा अशा थोर विचारवंतांचे विचार आत्मसात करून लहान मुले आता बोलू लागले आहेत .हेच मुले समाजात जाऊन भविष्यात कोणी डॉक्टर ,कलेक्टर, इंजिनीयर, वकील कोण समाजसेवक घडेल आणि समाज एक आदर्श पिढी घडल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी समाजातील होतकरू व्यक्तीने जर त्या रविवारी एक वेळेस फक्त मुलांना खाऊ देऊन धम्मदान करून या कार्याला चालना द्यायची आहे .आणि हे कार्य ओके पुढे अखंडपणे चालू ठेवण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे .समाजामध्ये मतभेद असतील पण मनभेद करू नका ,अशा प्रकारचे वक्तव्य मा.अशोक खोपे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केले.