विजयी उपनेता न्यूज :- पिंपरी चिंचवड 09/11/2023 मराठा समाज मराठा – कुणबी – मराठा जात प्रमाणपत्र देण्याबाबत आवश्यक पुरावे शोधण्याच्या अनुषंगाने महापालिकेशी संबंधित अभिलेखांमध्ये उपलब्ध असलेल्या पुराव्याची वैधानिक आणि प्रशासकीय तपासणी करून दस्तायेवजाची पूर्तता करून घेण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्याती आली आहे. अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली .आहेया
बाबत आयुक्त शेखर सिंह यांनी स्वतंत्र आदेश निर्गमित केला आहे .संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात मराठा समाजातील संबंधित व्यक्तींनी सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर केलेल्या पुराव्याची वैज्ञानिक आणि प्रशासकीय तपासणी करून कशी करावी तपासणी अंती कुणबी जातीचे प्रमाण पत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती निश्चित करून अहवाल शासनास सादर करणे कामी निवृत्त न्यायमूर्ती दिलीप शिंदे यांच्या अध्यक्षखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने 1948 ते 1967 या कालावधीत त जन्म – मृत्यू नोंदी ,शैक्षणिक अभिलेख, भूमी अभिलेख, सेवा नोंद पुस्तके तसेच पालीकातर्फे करण्यात आलेल्या करआकारणी नोंद रजिस्टर मध्ये कुणबी जातीच्या पुराव्याची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करून त्याबाबत अहवाल शासनाच्माया मार्गदर्शक निर्देशानुसार सादर करण्यासाठी निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आली आहे . या कामकाजाच्या अनुषंगाने महापालिकेच्या संबंधित विभागांना काही आदेश देखील देण्यात आले आहेत
पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभाग, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग ,भूमी जिंदगी ,लेखा विभाग तसेच करआकारणी व करसंकलन विभाग प्रमुखांनी सन १९४८ ते १९६७ कालावधीमध्ये महापालिकेच्या उपलब्ध अभिलेखाची छाननी करून अभिलेखांमध्ये कोणीबी जातीच्या नोंदणी असल्याचे आढळून आल्यास अशा पुराव्याची वैधानिक आणि प्रशासकीय तपासणी केली जाणार आहे.
या कामासाठी संबंधित विभागाचे प्रमुख जबाबदार असणार आहेत .या विभाग प्रमुखाने प्रमुखांनी नोडल अधिकाऱ्यांशी समन्वय साधून कामकाज पूर्ण करावे असे आदेश आदेशात नमूद केले आहे .या कामासाठी संबंधित विभागाच्या कर्मचारी वर्गाची नियुक्ती करावी ,पुराव्याच्या तपासणी अंती विभाग स्तरावर स्वतंत्र रजिस्टर तयार करण्यात यावे ,तसेच वितरण पत्रामध्ये माहिती नोंदणी आणि संकलन करून ते नोडल अधिकाऱ्याकडे सादर करावे .नोडल अधिकाऱ्यांना आवश्यकता वाटल्यास अधिकारी माहिती अथवा पुरावे जमा करण्याकामी संबंधित विभागाला अथवा विभाग प्रमुखाला निर्देश देता येणार आहेत .हे काम काल मर्यादित असून विहीत वेळेत कामकाज पूर्ण करावे असे आयुक्त शेखर सिंह यांनीआदेशात म्हटले आहे