विजयी उपनेता न्यूज :-13/11/2023 पिंपरी चिंचवड प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सर्व क्षेत्रीय कार्यालय मध्ये महिन्यातील दुसऱ्या व चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते .मात्र दिवाळी सणानिमित्त घोषित करण्यात आलेल्या सार्वजनिक सुट्ट्याचा विचारात घेता या महिन्यात होणाऱ्या जनसंवाद सभेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. सोमवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी जनसंवाद सभा होणार नसून या महिन्यातील जनसंवाद सभा सोमवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा ते बारा वेळेत होणार आहे .झालेल्या या बदलाची नोंद नागरिकांनी घ्यावी असे महापालिका प्रशासनाच्या वतीने आयुक्त शिखर सिंह यांनी सांगितले आहे नागरिकाची संवाद साधने, तक्रारीचे निवारण करणे ,आणि प्रशासकीय कार्यालयामध्ये तसेच होणाऱ्या विकास कामांमध्ये नागरिकांच्या अशा आकांक्षाचे प्रतिबिंब उमटवावे यासाठी क्षत्रिय कार्यालया जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येत असते .या सभे करिता महापालिकेच्या आठ क्षत्रिय कार्यालयासाठी क्षेत्रीय कार्यालय मुख्य समन्वय अधिकारी नियुक्त केले आहेत .ते या जनसंवाद सभेचे अध्यक्षस्आथान भुषवत आहेत.