विजयी उपनेता न्यूज :-16 फेब्रुवारी 2024 ,प्रतिनिधी माण ग्रामपंचायत मध्ये लोकप्रिय सरपंच सौ.अर्चना सचिन आढाव यांच्या पुढाकारातून ग्रामनिधीतून सोहळा कोटी रुपयाची विविध विकास कामाचा भूमिपूजन समारंभ 14 फेब्रुवारी रोजी पार पडला आहे. यामध्ये मानदेवी मंदिरामागील ओटा सुशोभीकरणाचे काम करणे, माण गावठाण स्मशानभूमीची सुधारणा करणे ,भैरवनाथ मंदिर परिसर सुधारणा व सुशोभीकरण करणे ,माण अंतर्गत विविध ठिकाणी अंतर्गत रस्ते करणे, माण अंतर्गत विविध ठिकाणी नवीन स्ट्रटलाईट पोल बसवणे, माणअंतर्गत विविध ठिकाणी भूमिगत गटार बांधणे ,माणगावठाण हद्दीतील एमआयडीसी पाण्यासाठी नवीन संपवेल टाकीचे बांधकाम करणे , अशा विविध विकास कामाचा ग्रामस्थांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.