विजयी उपनेता न्यूज :- 16 फेब्रुवारी 2024 प्रतिनिधी,माण ग्रामपंचायत परिसरातील नागरिकाच्या हजारो एकर जमीन यापूर्वीच एमआयडीसी ,पीएमआरडीए आणि कासार साई उज्वला कालवा यासाठी संपादित केले आहेत .राज्यातली पहिली हायटेक ग्रामपंचायत म्हणून माणची ओळख आहे. विकासाच्या सोयी सुविधा , स्थानिक विविध विकास कामे यामुळे आदर्श गाव म्हणून माण ग्रामपंचायतला पुरस्कार मिळाले आहेत .ग्रामपंचायत म्हणून माण ग्रामपंचायत ची एक अगली आगळी वेगळी ओळख आहे .आता पुन्हा अजून माण, हिंजवडी ,मारुंजी ही गावे महापालिकेत जाणार अशी चर्चा मागील काही वर्षांपासून सुरू आहे. अनाधिकृत बांधकामे, पायाभूत सुविधाची कमतरता वाढते नागरिकरण आणि स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी महापालिका मध्ये समाविष्ट केली पाहिजे अशी भूमिका काही नेते मंडळ वारंवार घेत आहेत . ह्या ग्रामपंचायती महापालिकेत घेण्याऐवजी त्यांची स्वतंत्र नगरपालिका अथवा नगरपरिषद करा अशी नागरिकांची मागणी आहे.