पिंपरी चिंचवड प्रतिनिधी (विजयी उपनेता न्युज) दि, 4 ऑक्टोबर भाऊसाहेब भोईर निर्धार मेळाव्यात बोलताना म्हणाले की मला सातत्याने डावलण्यात आले .2017 मध्ये सर्वजण भाजपमध्ये जात असताना आम्ही बारा नगरसेवक राष्ट्रवाद काँग्रेसमध्ये गेलो .असे असतानाही 2023 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत मला उमेदवारी दिली नाही .सर्वेक्षणात माझे नाव नसल्याचे कारण दिले. नेतेना माझ्याबद्दल कसला आकाश होता हे मला कळत नाही .25 वर्ष नगरसेवक असताना स्थायी समितीचे अध्यक्ष पद, महापौर, उपमहापौर ,विषय समिती असे अध्यक्षपदी दिले नाही ,पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष पद ही दिले नाही. कुटुंबत ही भांडण लावले भाजपच्या सत्ता काळात महापालिकेची लूट झाली. त्यामुळे प्रत्येक नेत्याला पिंपरी चिंचवड शहर आवडत आहे .प्रशासनाला काम करू दिले जात नाही. सत्तेवरून पैसा आणि पैशातून सत्ता असे राज्यकर्त्याचे समीकरण बनले आहे .शहरात पाच वर्षापासून एक दिवसात पाणीपुरवठा सुरू आहे .नियमित पाणी मिळत नाही. कचऱ्याचे व्यवस्थापन नाही. वाहतूक कोंडीच्या समस्याने नागरिक त्रस्त आहेत. गुन्हेगारी वाढत चालली आहे. शहर बकाल बनले आहे .दडपशाही झुंडशाही मोडीत काढण्यासाठी मी निवडणूक लढवणार आहे. असे भोईर म्हणाले उद्यापासून प्रचार सुरू करणार आहे . माझ्यासाठी सर्वच पक्षाचे दरवाजे उघडे आहेत माझ्या कार्यकर्त्याला दम दिला तर खपवून घेतले जाणार नाही .असेही त्यांनी सांगितले कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढणार आहे. असे त्यांनी निर्धार मेळाव्यात जाहीर केले . या मेळाव्यात माझे महापौर प्रभाकर वाघेरे ,ऋराष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक अतुल शितोळे, राजेंद्र जगताप, राजेंद्र साळुंखे ,सुजित पाटील, गणेश लोंढे इत्यादी उपस्थित होते.