चिंचवड प्रतिनिधी 24 /ऑक्टोबर 2024 चिंचवड मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार मा.शंकर जगताप यांच्या विजयासाठी प्रभाग क्रमांक 23 मधून महिला अध्यक्ष सोनाली संदीप गाडे यांनी पुढाकार घेतला असून थेरगाव परिसरात घरोघरी जाऊन त्या आजपर्यंत केलेली विविध विकास कामे समजावून सांगत आहेत.
स्व. लक्ष्मण जगताप यांनी केलेला चिंचवड मतदार संघाचा केलेला चौफेर विकास आणि मतदारसंघांमधील केलेली विविध विकास कामे याच जोरावर शंकर जगताप विजया ची बाजी मारणार असे सुजाण नागरिक सांगत आहेत. यावेळी सोनाली गाडे आणि तानाजी बारणे सह कार्यकर्ते उपस्थित होते.