विजयी उपनेता न्यूज:-( मावळ प्रतिनिधी)03/11/024 मावळ विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना मावळ पवना भागातून नागरिकाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे चोक चौका चौकात महिला त्यांचे औक्षण करत आहेत. शिरगाव येथील अभिमान टाऊनशिप मध्ये नागरिकाच्या भेटी घेऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या .ज्येष्ठ नागरिकांच्य आशीर्वाद घेतले. बापूसाहेब भेगडे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी खंबीर नेतृत्व आहे . त्यामुळे त्यांच्या पाठीशी आता खंबीरपणे महिला सुजाण नागरिकांनी उभा राहण्याचे आश्वासन देण्यात आले. यावेळी महिलांची संख्या लक्षणीय होती .
बापूसाहेब भेगडे यांनी नागरिकाच्या अडीअडचणी समजून घेतल्या आणि ती सोडवण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहणार असून त्यासाठी मला विधानसभेमध्ये पाठवण्याची गरज आहे असे ते म्हणाले, सोमाटणे फाटा शिरगाव या ठिकाणी ट्राफिकची मोठी समस्या आहे या ठिकाणी वर्दळीचे ठिकाण असल्यामुळे महिला ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागत आहे . असे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी मी वचनबद्ध राहणार आहे असे बापूसाहेब भेगडे यांनी म्हटले आहे