विजयी उपनेता न्यूज 03/11/024 भोसरी प्रतिनिधी : -भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना आरपीआय (आठवले गट) महायुतीचे उमेदवार आमदार महेशदादा लांडगे यांनी दिवाळी सणाचे औचित्य साधून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. विशेषतः जेष्ठ नागरिकांशी संवाद साधून त्यांचे आशीर्वाद घेतले.
कठीण काळात नेहमी आपली पाठराखण करणाऱ्या महेशदादा लांडगे यांच्या पाठीशी याही वेळी आपले आशीर्वाद असल्याचे ज्येष्ठांनी सांगितले. महिला भगिनींनी यावेळी ठिकठिकाणी औक्षण करून महेशदादांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.सध्या विधानसभा निवडणूक आणि दिवाळी दोन्हीची धामधूम सुरू आहे. भोसरी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महेशदादा लांडगे यांनी लक्ष्मीपूजन तसेच दिवाळी पाडव्याच्या दिवशी पंचक्रोशीतील विविध गावांचा धावता दौरा केला. त्या त्या गावातील ग्रामदैवतांचे दर्शन घेतले. स्थानिक मतदार व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. ज्येष्ठांशी संवाद साधून त्यांचे आशीर्वाद घेतले महेश दादा लांडगे यांनी त्यांच्या अडचणी समजून घेत सोडवण्यासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. असे आश्वासन त्यांनी दिले .देशात नरेंद्र मोदीचे मजबूत सरकार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही त्यांच विचाराचे सरकार आल्यास मतदार संघाचा विकास करण्यासाठी कोणती अडचण येणार नाही असे ते म्हणाले .त्यामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांनी जास्तीत जास्त लोकांना एकत्रित करून महेश दादा लांडगे यांना प्रचंड मताने विजय करणे आव्हान त्यांनी केले.