विजयी उपनेता न्यूज 15/11/024 स्वारगेट प्रतिनिधी पुणे :- पर्वती विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय अपक्ष उमेदवार आबा बागुल यांनी आजपर्यंत विविध विकासकामे केली आहेत. येणाऱ्या काळामध्ये विविध पायाभूत विकासाला प्राधान्य देऊन मतदार संघाचा चौफेर विकास केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही असे मत आमच्या प्रतिनिधी बोलताना आबा बागुल यांनी म्हणाले आहे.
मतदार संघातील शिक्षण व्यवस्थेमधील अमुलाग्र बदल करून दर्जेदार शिक्षण निर्माण करून गरिबाच्या घरापर्यंत विकास गंगा आली पाहिजे यासाठी मी विशेष प्रयत्न करणार आहे. तळागाळातील माणूस शिकला तरच पुढे जाईल असे माझे मत आहे. वाढत चाललेली बेकारी आणि गुन्हेगारी ही मोठी समस्या बनत चालली आहे .त्याला कायमस्वरूपी तोडगा काढून तरुणांना स्वावलंबी बनवण्यासाठ विशेष प्रयत्न करणार आहे. महीलाच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देणार असून मतदारसघातील आधुनिक यंत्रणा सुसज्ज करून संपूर्ण मतदारसंघ सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार आहे. गरिबासाठी उच्च दर्जाचे हॉस्पिटल निर्माण करणार आहे. जेणेकरून गरिबाला परवडे अशा माफक दरामध्ये हॉस्पिटल सुविधा देऊन गरिबाच्या हिताला प्राधान्य देणार आहे. माझे काम हीच माझी गॅरंटी आहे. येणाऱ्या 20 तारखेला हिरा या चिनहा समोरील बटन दाबून मला जनतेची सेवा करण्याची संधी दिल्यास मतदार संघ हिऱ्यासारखाच चमकवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही.असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.