विजयी उपनेता न्यूज, कात्रज प्रतिनिधी 16/11/024 पर्वती मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाच्या लोकप्रिय उमेदवार सौ अश्विनीताई कदम निवडणुकीच्या मैदानात उभे आहेत .
आज पर्यंत त्यांनी केलेली विविध विकासकामाच्या जोरावर परिवर्तन होणार आहे असे नागरिकांमध्ये कुजबूज चालू आहे. महिला सबलीकरणासाठी विशेष प्रयत्न केले. महिलांना चूल आणि मूल पर्यंतच मर्यादि न राहता स्वावलंबी बनवून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी काम केले. मतदारसंघातील गरीब नागरिकांसाठी अल्प दरात आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली .डायग्रोस्टिक सेंटरची उभारणी करून दिली. विद्यार्थ्यांना एका छताखाली विविध प्रमाणपत्रे आणि शासकीय योजनेची माहिती उपलब्ध करून दिली. महिला साठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची निर्मिती करण्यात आली. तसेच महिलांच्या आरोग्य साठी स्वतंत्र जिम उपलब्ध करून देण्यात आली.कोरोना काळामध्ये अश्विनीताई कदम कोरोना दूत म्हणून काम केले. महिला बालकन्या कल्याणच्या विविध योजना त्यांनी राबवल्या यामध्ये मौलाना अबुल कलाम आझाद व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना च्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक सहकार्य मिळवन दिले.
आज त्या पर्वती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार च्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहेत लोकाधिमुख नेतृत्व, काम करण्याची धडाडी गोरगरीब महिलांच्या मदतीला धावून येणाऱ्या एकमेव व्यक्ती म्हणून अश्विनीताई कदम यांचे नाव समोर येत आहे त्यामुळे अश्विनीताई कदम यांचा विजय निश्चित मानला जात आहे.