विजयी उपनेता न्यूज, भोसरी प्रतिनिधी 17/11/ 024 भाजप शिवसेना एनसीपी आरपीआय आणि मित्र पक्ष माहितीचे उमेदवार आमदार महेश दादा लांडगे आणि चिंचवड मधील शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ भोसरीतील ऐतिहासिक गाव जत्रा मैदान या ठिकाणी रविवार 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी होणार आहे .महेश दादा लांडगे दोन टर्म भोसरी विधानसभेचे प्रतिनिधीत्व करतात. दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी विविध विकास कामे केली आहेत.
भोसरी मतदार संघातील निवडणूक एकतर्फी वाटत असतानाच शेवटच्या टप्प्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अजित भाऊ गव्हाणे प्रचारात रंगत आणल्यामुळे ही निवडणूक अति तटीची होणार असल्याचे चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची तोफ धडकणार आहे ते आज काय बोलतात त्याच्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.