विजयी उपनेता न्यूज 07/11/024 पिंपरी प्रतिनिधी :- ”लक्ष्मणभाऊ जगताप यांनी शहराची आगळी वेगळी ओळख निर्माण केली. विकासाच्या वाटचालीमध्ये प्रचंड मोठी भूमिका घेण्याचा सिंहाचा वाटा हा लक्ष्मणभाऊंचा राहिला. अतिशय कमी वयात आणि महत्वाच्या वेळी लक्ष्मणभाऊ आपल्याला सोडून गेले. पण मला या गोष्टींच समाधान आहे की, त्यानंतर अश्विनी वहिनींवर चिंचवडकरांनी विश्वास दाखवला. अश्विनी वहिनींनी देखील कमी वेळामध्ये अतिशय उत्तम अशा प्रकरचा काम करून दाखवल. चांगले निर्णय त्यांच्या पाठपुराव्यामुळे आलेले आपल्याला बघायला मिळाले. आता या निवडणुकीमध्ये लक्ष्मणभाऊंचे कार्य पुढे नेण्यासाठी शंकरभाऊंना उमेदवारी दिली आहे. यापूर्वी लक्ष्मणभाऊ आणि अश्विनी वहिनींवर आपण विश्वास दाखवला, तसाच विश्वास शंकरभाऊंवर दाखवाल. चिंचवडच्या विकासाकरिता या विकासाचा आमदार म्हणून आपण त्यांना निवडून विधानसभेत पाठवाल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा बुधवारी (दि. ६) काळेवाडी फाटा, कस्पटे वस्ती येथील मैदानात संपन्न झाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांची ही पहिलीच प्रचार सभा होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गुजरातचे माजी गृहमंत्री आ. प्रदीप जडेजा. खा. श्रीरंग बारणे, आ. अश्विनी जगताप, आ. उमा खापरे, आ. अमित गोरखे, उमेदवार शंकर जगताप, नाना काटे, सचिन साठे, अनुप मोरे, विनायक गायकवाड, विलास मडिगेरी आदी उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले, मी नाना काटे यांचे आभार मानतो. त्यांनी युती धर्माचे पालन केले. मला पुढे संधी मिळेल पण आज मला युतीच सरकार आणायचं आहे. मोठ्या ताकदीने शंकर भाऊ यांच्या पाठीशी उभे राहू, असं म्हणत त्यांनी आपला अर्ज मागे घेतला आणि शंकरभाऊना समर्थन दिलं. जिल्ह्यातील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आण्यासाठी युती धर्माच पालन करा, जीवाच रान करा, असा संदेश त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.
पुढे बोलताना म्हणाले, पिंपरी चिंचवड शहर हे देशातील वेगान वाढणार शहर आहे. चिंचवडमध्ये लोकसभेनंतर मतदारांच्या संख्यामध्ये ५० ते ६० हजार मतांच्या संख्येमध्ये मला फरक दिसतोय. म्हणजे किती वेगान शहराची लोकसंख्या वाढतीये. वेगान नागरीकरण होतय. मी मुख्यमंत्री असताना लोकसंख्येचा विचार करत मी आंद्रा धरणातून शंभर एमएलडी पाणी आणि आता भामा आसखेडमधून १६० एमएलडी पाणी उपलब्ध करून दिल. पहिलं पाणी पोचलं, दुसऱ्या कामाचं भूमिपूजन झालं. शंकरभाऊ मला सांगत होते, ‘एवढ्या पाण्याने आमच भागणार नाही, आम्हाला अजून पाणी द्यावे लागेल.’ मी तुमच्या साक्षीने सांगतो हे आपलं महायुतीचे सरकार या शहराला पाणी कमी पडून देणार नाही. नागरिकांना जेवढ पाणी लागेल ते मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये पाणी वेगवेगळ्या धरणातून तुम्हाल देण्याच काम आपल्या सरकारच्या माध्यमातून करू. शेवटी पिंपरी चिंचवड हे वाढत शहर आहे. नागरीकरण या ठिकाणी होतय आणि त्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची समस्या हि मोठ्या प्रमाणात आपल्याला दूर करायची आहे.