विजयी उपनेता न्यूज, मावळ प्रतिनिधी 10/11/02 मावळ मतदार संघातील महायुती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भाजपा, शिवसेना आरपीआय ,एस आर पी व इतर मित्र पक्षाचे महायुतीचे अधिकृत उमेदवारअधिकृत उमेदवार मा.सुनील शेळके हे निवडणूक लढवत आहेत. मतदार संघातील नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी, रस्ते पर्यटन विकास आरोग्य तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे.
मतदारसंघातील नागरिकाचे राहणीमान आणि जीवनमान उंचावण्यासाठी मी सतत प्रयत्न करणार आहे. मी मावळचा प्रतिनिधी या नात्याने आजपर्यंत अनेक विकास कामे केली. सरकारच्या माध्यमातून महिलांच्या खात्यावर प्रत्येकी दीड हजार रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर एक आगळावेगळा आनंद दिसत आहे. त्यामुळे मावळ मतदार संघातील नागरिक तरुण विशेषतः महिला वर्गाचा उत्स्फूर्त असा मला पाठिंबा मिळत आहे आजपर्यंत केलेल्या विकास कामावर मी पुन्हा विजयाची हॅट्रिक मारणार आहे. सुजाण नागरिक मी केलेल्या विविध विकास कामाची पावती दिल्याशिवाय राहणार नाही .हा माझा ठाम विश्वास आहे येणाऱ्या कालखंडामध्ये मतदार संघाचा सर्वांगीण विकास करू जनसामान्यांना विकासाच्या प्रवाहात आणल्याशिवाय मी स्वस्त राहणार नाही असे मावळ विधानसभा मतदारसंघातील सुनील आण्णा शेळके यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.