विजयी उपनेता न्यूज प्रतिनिधी- नवी दिल्ली 22 /05/ 2023 केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला असून दिल्लीतील अधिकाऱ्याच्या बदल्या आणि पोस्टिंगच्या अधिकार स्वतःकडे ठेवण्यासाठी अध्यादेश काढला आहे. हे केंद्र सरकारने हा अध्यादेश दिलेचे नायब राज्यपाल विनय कुमार यांना दिला असून हा केजरीवाल सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने या संबंधित निकाल देताना दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंगचे अधिकार हे दिल्ली सरकारला असल्याचा निर्णय दिला होता .केंद्र सरकारच्या या आदेशानंतर दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्याचे अधिकार हे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्याकडे म्हणजेच अप्रत्यक्षरीत्या केंद्र सरकारकडे असणार आहेत. दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे, पण या ठिकाणी विधिमंडळ आहे पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती कार्यालय ,अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था आणि प्राधिकरणे दिल्लीत कार्यरत आहेत .सर्वोच्च न्यायालयासह अनेक घटनात्मक संस्था आहेत. अनेक परदेशी कार्याल आहेत.अशा परिस्थितीत त्यांच्या सुरक्षेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. असे केंद्र सरकारने म्हटले आहे .दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यावर अधिकच भीती व्यक्त केली होती. त्यांनी ट्युट केले होते की, नायब राज्यपाल न्यायालयाच्या आदेशाचे पालन का करत नाहीत ? दोन दिवस सेवा सचिवाच्या निलंबनाच्या फाईलवर सही का केले नाही ?पुढच्या आठवड्यात केंद्र सरकार अध्यादेश आणून सर्वोच्च न्यायालयाचा आदेश फिरवणार आहे .असे बोलले जात आहे.