विजयी उपनेता न्यूज -मुंबई प्रतिनिधी- 02/07/2023 राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली .हा तिसरा राजकीय भूकंप यावेळी घडून आल्याने राज्यात चर्चना उदान आले आहे. अजित पवार भाजप सोबत हात मिळवणे करून सत्ता स्थापन करतील का? असा प्रश्न उपस्थित होता. पण आज अजित पवार यांच्या राजभावनात शपथविधी झाला त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या नव आमदाराने मंत्रीपदाची शपथ घेतली आहे .यात मंत्री म्हणून छगन भुजबळ, दिलीप कोळसे पाटील , हसन मुश्रीफ,धनंजय मुंडे ,आदिती तटकरे, धर्मराज बाबा आत्राम ,संजय बनसोडे, अनिल पाटील यावेळी राज्याचे राज्यपाल श्री रमेश बैस ,राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राजभवनात शपथविधी भार शपथविधी पार पडला यावेळी भाजप ,शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादीचे अजित पवार मानणारे नेते ही उपस्थित होते यापुढे महाराष्ट्राचा दोन उपमुख्यमंत्री मिळाले असल्याचे दिसत आहे.