विजयी न्यूज – 10/07/023 प्रतिनिधी चिखली धम्म संस्कार वर्गाच्या माध्यमातून आज पर्यंत त्यांनी 40 धम्म संस्कार वर्ग शिकून झाले आहेत . आतापर्यंत त्यांनी चार आर्य सत्य हे लहान मुलांना खेळी मळीच्या वातावरणामध्ये त्यांच्या बाल मनावर बिंबवले जात आहे. चार आर्य सत्य है बौद्ध धम्माचा पाया आहे. 2575 वर्षांपूर्वी बनारस जवळील सारनाथ (ईशान्य भारत ) येथे पहिली बुद्धाची धर्म संदेश आपल्या पाच शिष्यास दिला होता .त्यावेळी चार आर्य सत्य सांगितले होते . 1) जगात दुःख आहे . 2 ) त्या दुःखाला कारण आहे.3) हे कारण म्हणजे तृष्णा (वासना) होय .4) वासना नियंत्रित करणे हा दुःख नियंत्रणाचा उपाय मार्ग आहे. 1) पहिले आर्यसत्य दुःख 2)दुसरेआर्यसत्य दुःखाचे मूळ 3) तिसरे आर्यसत्य दुःख निरोध ,4)चौथा आर्य सत्य दुःख निरोध (जीवणाचा विजय ),बौद्ध धर्म असे सांगतो की, कोणत्याही प्रश्नाची उकल शीलतेचे पालन आवश्यक आहे. आत्मसंमय ( नीती )समाधी मनसंयम व प्रज्ञा (प्रज्ञावंत) आवश्यक आहेत .म्हणून प्रज्ञा ,सील ,समाधी या तीन बाबींना धम्मात महत्त्वाचे स्थान आहे .या तीन बाबीवर अष्टाणिक मार्ग आधारित आहे .काम तृष्णा ,विभव तृष्णा ह्या दुःखाच्या मुळाशी असतात. याविषयी जाणीव ठेवून तृष्णेवर प्रभुत्व मिळवणे म्हणजेच जीवनाचा सर्वात मोठा विजय आहे अशा प्रकारचे मौलिक समाज परिवर्तनाचे बालमनावर धम्कमसंस्कार करून आदर्श पुढी घडवण्याचा वसा अशोक खोपी यांनी घेतला आहे .असे आम्हास वाटते .त्यानी चालू केलेला हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे.