विजयी उपनेता न्यूज -: 26 /12/2023 सध्या भूगाव येथील तलाठी पदावर कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष नामदेव निवृत्ती पासलकर यांची नुकतीच मंडलधिकारी म्हणून पदोन्नती झाली आहे .असे पुणे जिल्हाधिकारी राजीव देशमुख यांनी पदोन्नती बाबत आदेश काढले आहेत. पासलकर यांनी आठ वर्ष आडमाळ गावचे उपसरपंच सात वर्षे मुळशी तालुका तलाठी संघाचे अध्यक्ष सहा वर्षे पुणे जिल्हा तलाठी संघाचे उपाध्यक्ष अशी विविध पदावर त्यांनी काम केले आहे. मनमिळाऊ व सर्वसामान्य हिताला प्रधान देणारे व्यक्तीमत्व असा त्यांचा नावलौकिक आहे .अशा या कर्तव्यदक्ष व्यक्तीची शासन दरबारी नोंद घेऊन त्यांना नुकतेच मंडळअधिकारी म्हणून नवनिर्माण कासार आंबोली या मंडळ भागात करण्यात आली आहे. त्यांच्यामुळे सर्व स्तरातुन त्यांचे स्वागत करण्यात येत आहे. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.