विजयी उपनेता न्यूज:-26/12/2023 चिखली प्रतिनिधि अंकुर सेवा संघ प्रायोजित सिद्धार्थ बुद्ध विहाराचा सहावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात मध्ये फुले शाहू आंबेडकर शाहिरी जलसा हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाला परिसरातील बौद्ध उपासक उपासिका बालक तथा बालिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. हे कार्यक्रम सुरू करताना प्रथम धम्म संस्कार वर्गातील मुलांनी स्वागत गीत म्हणून प्रेक्षकाचे मने आकर्षित केली या धम्म संस्कार वर्गातील मुलांनी सुंदर असे स्वागतगीत सादर केल्यामुळे मुलाचे आणि संस्कार वर्गाचे संचालक अशोक खोपे यांचे पण आभार मानले व टाळ्याच्या कडकडात स्वागत केले यावेळी अंकुर सेवा संघाचे संचालक बाळासाहेब बनसोडे ,अशोक खोपे, कैलास पाटील ,प्रमोद मगर, दामोदर उपरवट ,मनोहर शिरसाट, विक्रम धनवडे इत्यादी सह कार्यकर्ते मोठ्या उत्साहात उपस्थित होते.