विजयी उपनेता न्यूज पिंपरी प्रतिनिधी 27 01/024 मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आरपारची लढाई करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या लढाईला अखेर यश आले आहे .सरकारकडून मनोज जरागे यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत .यासंदर्भातील अध्यादेश काढल्याची माहिती आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता जरांगे यांचे भेट घेणार आहेत. यानंतर जरांगे उपोषण सोडणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज रंगे पाटील यांच्या मागणीनुसार सरकारकडून नवा आदेश काढण्याची माहिती आहे . तो अध्यादेश जरांगे पाटील यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. या संदर्भात काल रात्री उशिरा बैठक झाली. या बैठकीमध्ये पालकमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि काही वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे हे देखील उपस्थित होते मनोज जरांगे पाटील यांनी संध्याकाळी भाषणात नमूद केले होते की ,आजच्या आज आदेश नाही निघाला तर मग मराठा बांधव उद्या मुंबई मुंबईला येतील, जर आदेश मिळाला आणि तो योग्य असला तर ते गुलाल उधळायला मुंबईला येणार असे देखील त्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे जयांगे पाटील आज मुंबईत गुलाब उधळायला येणार असल्याचे सांगण्यात येत आहे .
समस्त मराठा समाज बांधवांचे अभिनंदन, राज्य सरकारने मरोज जरंगे पाटील यांनी केलेल्या सर्व त्याला आपल्या लढायला मोठे यश मिळालेल्या मिळाले आहे .आज सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थित आपली विजय सभा होणार आहे .सर्वांनी उपस्थित राहावे असे आव्हान सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.