विजयी उपनेता न्यूज: पिंपरी प्रतिनिधी 26 जानेवारी 024 संविधानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्य भारतीय नागरिकाला संविधानामुळे मिळाली त्यामुळे हा 26 जानेवारी राष्ट्रीय सण हा 74 वा वर्धापन दिन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .यानिमित्त पालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रमाणात ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेची सामुहिक वाचन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या आयुक्ताने नागरिकांना शुभेच्छा दिल्या. या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महापालिकेचे कामकाज सुरळीतपणे पार पडण्यास मोलाचे योगदान देणाऱ्या विद्युत विभागातील कर्मचारी ,वैद्यकीय विभागातील स्टाफ ,नर्स तसेच वार्ड बॉय आया लिफ्टमन ,सफाई मित्र ,शिपाई उद्यान विभागातील कर्मचारी आणि वाहनचालक अशा विविध विभागातील एकूण 75 कर्मचाऱ्यांचा फेटा बांधून आणि आयुक्त यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
राष्ट्रध्वजारोहण कार्यक्रमास आमदार उमा खापरे, माजी नगर सदस्य गोविंद पानसरे ,नामदेव ढाके अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील ,विजयकुमार खोराडे, उल्हास जगताप मुख्य लेखापाल प्रमोद भोसले ,मुख्य लेखा वित्त अधिकारी प्रवीण जैन ,शहर अभियंता मकरंद निकम ,मुख्य अभियंता रामदास तांबे ,श्रीकांत सवणे ,उपायुक्त विठ्ठल जोशी ,संदीप खोत, मनोज लोणकर , मिनीनाथ दंडवते ,निलेश भदाणे शहर अभियंता संजय कुलकर्णी , ज्ञानदेव जुधांरे बाळासाहेब गलबळे ,प्रमोद ओभासे, यशवंतराव चव्हाण समृद्धी रुग्णालयाचे अधिष्ठंटा डॉक्टर राजेंद्र वाबळे ,आरोग्य अधिकारी डॉक्टर लक्ष्मण गोपने, अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉक्टर अभयचंद्र दावेदार ,मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण ,विशेष अधिकारी किरण गायकवाड ,सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे ,राजेश आगळे ,विजयकुमार थोरात, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहीवाल अग्निशामन अधिकारी ऋषिकांत देशपांडे चिताडे ,कर्मचारी महासंघाच्या चारुशीला जोशी यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख महापालिका कर्मचाऱ्या आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तसेच महापालिकेच्या वतीने भक्ती शेती चौक निगडी येतील सामूहिक राष्ट्रगीता नंतर देशभक्ती देशभक्तीपर गीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .त्यामध्ये विविध देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली.