विजयी उपनेता :- चिंचवड प्रतिनिधी 31/ 10/024 राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नाना काटे यांनी बंडखोरी करत जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे पिंपरी सौदागर येथील महादेव मंदिरात दर्शन घेऊन नाना काटे त्यांच्या रॅलीला सुरुवात झाली. यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक प्रशांत शितोळे विनोद नढे संतोष कोकणे ,उषा माई काळे ,हरिभाऊ तीकोणे, खंडू शेठ कोकणे ,सतीश साठे, शेखर चंद्रकांत काटे ,श्याम जगताप सचिन काळे तानाजी जवळकर नवनाथ नढे चंद्रकांत तापकीर बापू कातळे, विष्णू शेळके, सागर कोकणे, संगीता कोकणे, प्रशांत सपकाळ सुमित डोळस काळूराम कवितके यांच्यासह अनेक माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते चिंचवड मतदार संघातील जनता माझ्या पाठीशी अआहे . चिंचवड मतदार संघातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडूक लढत आहे . मी जनसामान्यां तळागाळातील कार्यकर्ता असल्यामुळे मला मतदार संघातील जनतेची साथ मिळत आहे. मी कोणत्याही राजकारण न करता चिंचवड मतदार संघाचा विकास करणे हेच माझे ध्येय असल्यामुळे मी निवडणूक लढवीत आहे.